Ranatalya Kavita (Marathi Edition) By N.D. Mahanor Paperback 8171850928 9788171850921 Ranatalya Kavita (Marathi Edition) या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे / कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे अशी संपूर्ण नवीन, सुंदर शब्दकळा आणि निसर्गाची आशयगर्भ रूपे सर्वप्रथम मराठी कवितेत अवतरली ती ना. धों. महानोर यांच्या कवितेतून. रानातल्या कविता हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. निसर्गाच्या निरावरण सौंदर्याचे अनेक उन्मेष महानोरांनी उत्सकु व रसिक दृष्टीने पाहिले आहेत. इतकेच नव्हे, तर त्याच्या संवेदना त्यांनी जाणल्या आहेत. त्यांचे रानाशी, शेतीशी झालेले सायुज्य शारीरिक व भावनिक अशा दोन्ही स्वरूपांचे आहे. तोच महानोरांचा संपूर्ण अनुभव आहे. हाच अनुभव महानोरांच्या रानातल्या कविता या काव्यसंग्रहात आपल्या प्रत्ययाला येतो. [1]
.
Ranatalya Kavita Marathi Edition
Ranatalya Kavita (Marathi Edition) By N.D. Mahanor |
8171850928 |
9788171850921 |
Marathi |
120 |
Paperback |
